-MPC-TOP-MOST-BANNER-I

Today’s Horoscope 22 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – गुरूवार दि. 22 जुलै 2021

  • शुभाशुभ विचार – 13 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मूळ 16.25 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

—————————————

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग -निळा)

कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळच येणार नाही.

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर अगदी बेहद खुश असेल.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतात. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. कुणाकडे सल्ले मागायला जाऊच नका. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

सिंह – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. हौशी मंडळी तर आज चक्क कामावर दांडी मारून जीवाची मुंबई करतील. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. काही भाग्यवान मंडळी आज नव्या घराचा ताबा घेतील.

तुळ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद टाळा. शेजारी आज  फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखाद्या प्रश्‍नात सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग- भगवा)

असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. आज थकवा जाणवेल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. गर्भवतींना मनोवांछित संतती चा लाभ होईल.

मीन – ( शुभ रंग – नारंगी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. तरुणांची ध्येयाकडे यशस्वी वाटचाल होईल.

!! शुभम भवतु !!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn