Today’s Horoscope 22 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 March 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – बुधवार.
22.03.2023.
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष- गुढीपाडवा. अभ्यंग स्नान, संवत्सरारंभ.
राहू काळ – दुपारी 12.00 ते01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 15.32 पर्यंत नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. आज सत्संगातून मनःशांती मिळेल.
वृषभ (शुभ रंग- जांभळा )
तुमसे कार्यक्षेत्रातील महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते.
मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्यासाठी अनुकूल वातावरण राहील वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे अधिकरांचा गैरवापर टाळा व कायद्याच्या चौकटीतच राहा.
कर्क (शुभ रंग- गुलाबी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांनी इतरांच्या भानगडीत न डोकवता फक्त बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.
सिंह (शुभ रंग- मरून )
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावर ढकललेले बरे. पती-पत्नी मधील वादावर आज मौन हा रामबाण उपाय ठरणार आहे.
कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात वावरताना आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. समोरची प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळणार आहे आज पत्नीच योग्य सल्ले देईल.
तूळ ( शुभ रंग- पांढरा)
ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अतिवस्त दिवस असून ज्येष्ठ मंडळींनी आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी.
वृश्चिक (शुभ रंग- निळा)
नोकरदार वरिष्ठांचे मूड सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
धनु- (शुभ रंग- लाल)
आज आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली कमाई होईल. कलेच्या क्षेत्रातील नवोदिताना स्ट्रगल वाढवावी लागेल.
मकर ( शुभ रंग- मोतिया )
सगळी म्हत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.
कुंभ (शुभ रंग – भगवा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न सहजच मार्गी लावाल. विरोधक माघार घेतील.
मीन -(शुभ रंग – मोतिया )
महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा सुसंवाद साधा.