-MPC-TOP-MOST-BANNER-I

Today’s Horoscope 22 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार…  रविवार, ….. ​दि​. 22  नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार -१० नंतर चांगला.
  • आज विशेष – गोपाष्टमी, दुर्गाष्टमी.
  • राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – धनिष्ठा ११.०९ पर्यंत नंतर शततारका.
  • चंद्र राशी –  कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग – डाळिंबी)

प्रकृतीस्वास्थ्य चांगले असल्याने तुमचा कामातील उत्साह वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित लाभ होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून )

कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. कार्यक्षेत्रात सावधपणे निर्णय घ्यावे लागतील.

 

मिथुन  (शुभ रंग – गुलाबी)

नवीन व्यावसायिकांनी धंद्यात मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक धाडस करू नये. ज्येष्ठ मंडळींनी जवळ असलेली पुंजी जपून वापरणे गरजेचे आहे. आज भक्तिमार्गात रमाल.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी मौजमजा करताना आपल्या मर्यादित राहावे. चुकीच्या वर्तनाने मानहानी होऊ शकते. क्षणिक मोह टाळणे हिताचे. ड्रायव्हिंग करताना जरा जपून.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सिंह – (शुभ रंग- चंदेरी)

आज काही महत्त्वपूर्ण बातम्या कानी येणार आहेत. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची साथ मोलाची राहील. दुकानदारांकडे ग्राहकांची चांगली वर्दळ राहील.

कन्या (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी आज तुम्हाला हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतात. संयम ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा.

तूळ  – (शुभ रंग – लेमन)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक स्तरावर घडलेल्या काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणी हसतमुख असतील.

धनु (शुभ रंग -निळा)

आज काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध तयार होतील, व ते भविष्यकाळात व्यवसायाच्या  दृष्टीने फायदेशीर ठरतील.

मकर – (शुभरंग- पिस्ता)

काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील.  अति स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

कुंभ (शुभ रंग -आकाशी)

आज तुमची तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभही होणार आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जे मनी योजाल ते तडीस न्याल.

मीन  (शुभ रंग- पांढरा)

कामधंद्याच्या ठिकाणी आज काही किचकट प्रसंग कौशल्याने हाताळाल. गृहिणींनी गप्पांतून गैरसमज वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आज खर्च करावाच लागेल  बचतीचा विचार सोडून द्या.
( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1