Today’s Horoscope 22 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 22.11.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस. 

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा  भाद्रपदा 18.37 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ 12.58 पर्यंत नंतर मीन.

—————————–

मेष  ( शुभ रंग – मोरपिशी)

आज दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचारच सोडून द्या संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल आज गरजेपुरते आध्यात्मिकहीवाल प्रवासाचा आनंद

लुटाल.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस जे जे चिंताल ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अनपेक्षित खर्च दार ठोठावतील.

मिथुन ( शुभ रंग- तांबडा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. संध्याकाळी सहकुटुंब मौजमजेस प्राधान्य द्याल.

कर्क  ( शुभ रंग – पिस्ता)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे मात्र रखडतील. गृहिणी दानधर्म करतील.

सिंह ( शुभ रंग – क्रीम)

कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या ( शुभ रंग- केशरी)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य असल्याने तुमचे मनोबलही उत्तम असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. संध्याकाळी कामावरून येताना गाडी हळू चालवा.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होऊ शकतील.

वृश्चिक ( शुभ रंग – चंदेरी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

धनु  (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला अत्यावश्यक वाटेल. तुम्हाला मुलांच्या अभ्यासातही डोकवावे लागणार आहे. आज गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल.

मकर (शुभ रंग- भगवा)

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेवू नये.

कुंभ  (शुभ रंग- पांढरा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. खरे बोलण्यापेक्षा आज गोड बोलणे हिताचे राहील.

मीन ( शुभ रंग- निळा)

आज स्वतःचेच खरे करू नका इतरांचेही ऐकून घेणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. गोडबोल्या मंडळींचे गोड बोलणे फार मनावर घेऊ नका.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.