Today’s Horoscope 23 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार बुधवार. ….. ​दि​.  23 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
  • दिशा शूल -उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती.
  • चंद्र राशी – मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- मरून)

आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. आज असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळता येणार नाही. घरातील थोर मंडळींना दुखावू नका.

.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीबाबत आनंददायी घटना घडतील

मिथुन (शुभ रंग- गुलाबी)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस

कर्क(शुभरंग- पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मानसिक शांती आज सत्संगातूनच मिळेल

सिंह – ( शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे.  नीतीबाह्य  वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. आज पत्नीच्या हॉल आहोत म्हणा विषय जास्त ताणू नका.

.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल.  वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ ( शुभ रंग – सोनेरी)

जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. काही डोक्याला ताप देणारी माणसे भेटतील.

वृश्चिक  ( शुभ रंग – नारंगी)

महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. नोकरीत काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. आज संध्याकाळी लवकर घर गाठा, पत्नी आतुरतेने वाट पहात असेल

धनु  ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यवसाय तेजीत चालतील.

मकर – ( शुभ रंग- निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. ऑफिस कामासाठी प्रवास घडतील. प्रवासात झालेल्या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील.

कुंभ ( शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन (शुभ रंग- जांभळा)

लहरी व हट्टी स्वभाव काबूत ठेवा. तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.