Today’s Horoscope 23 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 23 फेब्रुवारी 2021
- शुभाशुभ विचार – 18 नंतरचांगला दिवस.
- आज विशेष – जया एकादशी.
- राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
- दिशा शूल – उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – आद्रा 12.31 पर्यंत नंतर पुनर्वसु.
- चंद्र राशी – मिथुन.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग डाळिंबी)
काही जिवलग मित्रांबरोबर गेट-टुगेदरचे बेत आखाल. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमध्ये सामंजस्य राहील.
वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विरोधकांचा विरोध गोड बोलून थोपवून धराल.
मिथुन – (शुभ रंग – हिरवा)
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका.
कर्क – (शुभ रंग – निळा)
आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क राहा. सरकारी नियम तोडल्यास आज दंड चुकणार नाही. आपल्या मर्यादेत रहा.
सिंह – (शुभ रंग – मरून)
आज तुमची आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल.
कन्या – (शुभ रंग – आकाशी)
आज फक्त नाकासमोर चालणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीस प्राधान्य देणे आवश्यक राहील. संध्याकाळी वेळेवर घर गाठणे हिताचे राहील.
तूळ – (शुभ रंग – जांभळा)
व्यवसायात आवाक्याबाहेर गुंतवणूक नको. आज कष्टाच्या प्रमाणात मोबदला जेमतेम राहील. सुसंवाद साधून आज तुम्ही विरोधकांची ही मने जिंकु शकाल.
वृश्चिक – (शुभ रंग – निळा)
भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचीही मते समजून घ्यावीत. वैवाहिक जीवनात स्वतःच्या चुका शोधा.
धनु – (शुभ रंग – गुलाबी)
समाजात व मित्रमंडळीत तुमचा मानमरातब वाढेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान द्याल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
मकर – (शुभ रंग – मोरपंखी)
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्कीच मिळेल. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद नकोत.
कुंभ – (शुभ रंग – चंदेरी)
हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे सुसाट धावतील. काही महिला किमती खरेदी करतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल.
मीन – (शुभ रंग – मोतिया)
व्यापार्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. रखडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. कौटुंबिक प्रश्न सोडवताना आईचा सल्ला आज अवश्य घ्या. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील.
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)