Today’s Horoscope 23 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

23-02-2023

शुभाशुभ विचार- 14 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- विनायक चतुर्थी.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती.

चंद्र राशी – मीन.

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- मोतिया )

आज काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत सांभाळा.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

तुमच्या कार्यक्षेत्रातील अतिवस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पतकरावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. व्यस्त दिवस.

कर्क (शुभ रंग- मरून.)

तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. ज्येष्ठ मंडळी आज सत्संगात रमतील.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून लांबच रहा. जोडीदार सांगेल तेच आज योग्य असेल.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 27 – प्रतीलता शाप की वरदान?

कन्या ( शुभ रंग- निळा)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेत समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्ती कराल.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे राहील.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)

सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी बजावतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

धनु- (शुभ रंग- केशरी)

आज गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण राहील. अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज गरजूंनाही तुम्ही मदत कराल.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रात आज विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. बेरोजगारांना आज नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – लाल )

आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीच्या आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून घडेल.

 

  शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.