Today’s Horoscope 23 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- शुक्रवार.

तारीख – 23.02. 2024.

शुभाशुभ विचार – 16  प.चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा 19.25 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 19.25 पर्यंत नंतर सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – आकाशी)

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ- ( शुभ रंग- अबोली)

कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज आईच्या शब्दाचा मान राखा. वादविवाद टाळा.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

खिशात पैसा खेळता असल्याने तुमचा मूड छान असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्या.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.

सिंह -( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणीही तुम्ही वरिष्ठांची मने जिंकू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल.

तूळ- ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.

वृश्चिक-  ( शुभ रंग – डाळिंबी)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानाला कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

धनु- (शुभ रंग- जांभळा)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागू शकते.

मकर-  (शुभ रंग- निळा)

आज तुमच्या कामातील उत्साह पाहून तुमच्या विरोधकही प्रभावीत होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी तुमचे आज चांगले सूर जुळतील.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात जरा सावध राहा.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.