Today’s Horoscope 23 January 2021; जाणून घेऊया आजचे राशिभविष्य’

आजचे पंचांग –
23. 01. 2022
वार – रविवार.
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराफाल्गुनी 11.09 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – लाल)
आज काही कारणाने तुम्हाला नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच लपलेला असू शकतो सावध राहा. क्रोधावर लगाम ठेवा.
वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )
काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. कलाक्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील. काही पेचप्रसंग चातुर्याने हाताळाल.
मिथुन -( शुभ रंग- पिस्ता )
व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पुढे सरकतील.
कर्क – ( शुभ रंग मरून)
आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज काही चुकीचे मोह, प्रलोभने तुम्हाला आकर्षित करतील. मनावर ताबा ठेवा.
सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)
आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल. तुमचे वक्तृत्व प्रभावी राहील.
कन्या – ( शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, तुमचा अहंकार दुखावणारी एखादी घटना घडू शकेल. स्वतःवर थोडा संयम ठेवा.
तूळ – (शुभ रंग डाळिंबी )
आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. आज बचतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे.
वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)
नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. छान दिवस.
धनु – ( शुभ रंग – निळा )
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल.
मकर – (शुभ रंग – मोरपंखी )
आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील.
नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.
कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल.
मीन – (शुभ रंग गुलाबी )
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असेच वातावरण राहील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.