Today’s Horoscope 23 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

23-03-2023

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती 14.08 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी – मीन 14.08 पर्यंत नंतर मेष.
—————————————-

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

दिवस खर्चाचा असेल तर बिनधास्त खर्च करायला हवा. आज कंजूषणाचा काहीही उपयोग नाही. तातडीने दूरच्या प्रवासास निघणाऱ्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी.

वृषभ (शुभ रंग- निळा )

दिवस लाभाचा असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलूनच राबवून घेतील. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. नोकरीत साहेब जितके विचारतील तितकेच बोला. संध्याकाळी लवकर घर गाठा.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

दूरच्या प्रवासात झालेल्या काही नव्या ओळखी पुढील काळात व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील ज्येष्ठ मंडळी आज तीर्थयात्रेचे बेत आखतील.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी )

महत्त्वाच्या कामात आज थोडेफार अडथळे येतील. आज आपल्या आवाक्या बाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. मोठ्या रकमेची नियान करताना सावध असावे. आज ताकही फुंकून प्यावे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

उद्योगधंद्याच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घेणेच हिताचे राहील.

 

Raj Thackeray : शिवसेना, धनुष्यबाण माझा की तुझा वाद पाहून वेदना झाल्या – राज ठाकरे

तूळ ( शुभ रंग- लाल)

नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून चांगली वागणूक मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. कामाच्या व्यापात तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा व अपेक्षा वाढतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल असेल. नवविवाहित मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनु- (शुभ रंग- केशरी)

बरेच दिवसांपासून दुर्लक्षित झालेल्या घरगुती कामांकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. गृहिणी मुलांच्या अभ्यासात डोकवतील.

मकर ( शुभ रंग- राखाडी )

तुमचा बराचसा वेळ आज रिकामटेकड्या गप्पा मारण्यात फुकट जाईल. तुमची काही गुपिते उघड होऊ शकतात. कमी बोलून आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणी अनपेक्षितपणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

आज तुम्ही एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. बरेच दिवसापासून गहाळ झालेली एखादी वस्तू आज अचानक सापडेल. आपल्या आवडत्या छंदास आज वेळ द्याल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.