Today’s Horoscope 23 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…बुधवार, दिनांक…23 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष … सामान्य दिवस.
  • राहूकाळ…..दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल… उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… ज्येष्ठा 18.25 पर्यंत, नंतर मूळ
  • आजची चंद्र राशी… वृश्चिक 18.25 पर्यंत नंतर धनु.

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – पांढरा)
काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडू शकतात. कुणालाही मोफत सल्ला द्यायच्या भानगडीत पडूच नका. आज फक्त आपल्याच ताटात बघून जेवा. कोणतीही रिस्क नको.


वृषभ(शुभ रंग – पिस्ता)
काही मनाजोगत्या घटना घडतील आणि तुमचा कामातील उत्साह वाढेल. महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. वैवाहिक जीवनात आज आय लव यु म्हणणे हिताचे राहील.

 

मिथुन(शुभ रंग – मरुन)
आज केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. तुम्हाला मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. आज तुमची तब्येत जरा नरमच राहील.

 

कर्क – (शुभ रंग – क्रीम)
उद्योग व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होणार आहे आहे. नवे हितसंबंध तयार होतील. आवडते छंदही जोपासाल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळण्याची शक्यता आहे.

 

सिंह(शुभ रंग – मोरपंखी)
बऱ्याच काळापासून रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासातही लक्ष घालावे लागेल. आज आईचे मन दुखवू नका.

कन्या(शुभ रंग – हिरवा)
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागणार आहे. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवायला हवा. वाद-विवाद टाळा. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञा पाळाव्यात.

 

तूळ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. प्रवासात मात्र त्रास होईल. आज गरजेपेक्षा जास्त बोलू नका.


वृश्चिक
– (शुभ रंग – गुलाबी)
आज तुमचा खर्च आवाक्‍याबाहेर जाईल काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील सतर्क राहा. आज काही कौटुंबिक गरजा भागवाव्या लागणार आहेत. मित्रांना पार्टी आज नको.

 

धनु – (शुभ रंग – भगवा)
काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. घरातल्या थोर मंडळींचेही सारखे उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासणार आहे.

 

मकर – (शुभ रंग – निळा)
आज  हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळचा वेळ अगदी मजेत जाईल. आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे.

 

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील.  तरुणांनी कुसंगत टाळावी, व्यसने घात करतील.

 

मीन –  (शुभ रंग – जांभळा)
आज मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आज एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना प्रचिती येईल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.