Today’s Horoscope 23 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 September 2022
शुक्रवार.
तारीख 23.09.2022
शुभाशुभ विचार- प्रतिकूल दिवस.
आज विशेष – मघा त्रयोदशी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00
दिशा शूल- पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- मघा.
चंद्र राशी- सिंह
————————————–
मेष – शुभ रंग – हिरवा – Today’s Horoscope 23 September 2022

आज आनंदी व उत्साही असाल. मौल्यवान खरेदी कराल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालणार आहेत नवीन कलावंतांची प्रसिद्धीची हाऊस भागेल. छान दिवस

वृषभ – शुभ रंग- सोनेरी

आज प्रॉपर्टीची खरेदी विक्री तुमच्या फायद्यात राहील. तरुणांनी बेफिकिर वृत्तीस लगाम द्यावा. आज मुलांच्या मागण्या पूर्वाव्या लागणार आहेत. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

मिथुन – शुभ रंग – राखाडी

आज केवळ भिडस्‍तपणापायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज फक्त आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे.

कर्क – शुभ रंग- पांढरा

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील फार काळजी करू नका परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज वैवाहिक जीवनातले मतभेद संध्याकाळी निवळतील.

सिंह – शुभ रंग- निळा

दुकानदारांची थकीत उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

कन्या – शुभ रंग- डाळिंबी

हाती असलेला पैसा आज जपूनच वापरा कदाचित एखादा असा मोठा खर्च उद्घावेल किजो टाळता येणार नाही एखादी चीज वस्तू गहाळ होईल. सतर्क रहा.

तूळ – शुभ रंग – आकाशी

जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होणार आहेत व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

वृश्चिक – शुभ रंग – मरून

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक आदबीने वागतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल .

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होऊ शकते. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यावे. वाहतुकीचे नियम मोडू नका दंड चुकणार नाही.

मकर – शुभ रंग- पिस्ता

नवीन ओळखीवर लगेच विश्वास टाकू नका. घरात वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गाडी चालवताना डोक्यात इतर विचारांची गर्दी नको.

कुंभ – शुभ रंग- मोरपंखी

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. तुमची आर्थिक बाजू आज भक्कम असल्याने थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका. आज वैवाहिक जीवनात लाडीक रुसवे फुगवे असतील.

मीन – शुभ रंग- भगवा

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. हाती असलेला पैसा जपूनच वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Jeevan Gaurav Award : संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.