Today’s Horoscope 24 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  गुरुवार…. ​दि​.  24 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार — शुभ दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र -अश्विनी.
  • चंद्र राशी –  मेष.

आजचे राशीभविष्य

मेष- ( शुभ रंग- जांभळा)

आज तुमच्या एखाद्या आवडत्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. पैशाची अडचण दूर होईल. दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. आज जोडीदाराचे मन जिंकाल.

.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)
व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढती राहिल. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. एखाद्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

मिथुन- ( शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील जे मनी योजल ते तडीस न्याल. इतरांनाही कामात मदत कराल. गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.
कर्क – ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठांकडून आज सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्य निष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न मात्र दुर्लक्षित होतील.
 

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)
मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. शासकीय कामे मात्र रखडतील.

.

कन्या- (शुभ रंग- राखाडी)
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा अत्यंत कंटाळवाणा दिवस असून आज तुम्हाला एखाद्या सत्संगाची गरज भासेल.

तूळ- ( शुभ रंग – चंदेरी )
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)
कार्यक्षेत्रात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश वाटते तेवढे सोपे नाही. ज्येष्ठांनी क्षुल्लक वाटणारी दुखणी ही अंगावर काढू नयेत.

धनु- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. गरजूना आपण होऊन मदत कराल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर-( शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. मागण्या पूर्ण झाल्याने बच्चे कंपनी खुश असेल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून )
आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शेजार्‍यांशी असलेले मतभेद सुसंवादाने दूर होतील.

 

मीन – ( शुभ रंग- मोतिया )
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रग्रहण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. नवीन परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.