Today’s Horoscope 24 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार – शनिवार, 24 डिसेंबर 2022. (Today’s Horoscope 24 December 2022)
  • शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
  • आज विशेष- सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
  •  दिशा शूल – पूर्वेस असेल.  आजचे नक्षत्र – पूर्वाशाढा २२.१५ पर्यंत नंतर उत्तराशाढा.
  • चंद्र राशी – धनु.

—————————————-

मेष – (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे.

कर्क (शुभ रंग- पिस्ता ) (Today’s Horoscope 24 December 2022)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द मात्र जपून वापरा.

सिंह (शुभ रंग- पांढरा)

आज दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

कन्या ( शुभ रंग-हिरवा )

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. खेळाडूंनाही सराव वाढवावा लागेल.

 

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

वास्तु व वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम ) (Today’s Horoscope 24 December 2022)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली नाती जवळ येतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी )

आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल. जिकडे-तिकडे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कठोर बोलल्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणालाही मागितले नसताना सल्ले देऊ नका.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

काही जणांना आज तातडीने प्रवासाला निघावे लागण्याची शक्यता आहे. घरात मोठ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधली तर सापडेल.

Chikhali Murder : चिखली येथे मित्रांच्या वादात तरुणाचा खून

कुंभ (शुभ रंग – आकाशी )

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही होईल. लांबच्या प्रवासात अजिबात बेसावध राहू नका.

मीन -(शुभ रंग – लाल ) (Today’s Horoscope 24 December 2022)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल. हाताखलच्या लोकांवर वचक ठेवणे गरजेचे आहे. हाती असलेला पैसा जपून वापरा भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन त्यात अडकू नका.

शुभम भवतु

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.