Today’s Horoscope 24 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  बुधवार, ​दि​. 24 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – प्रदोष, भीष्म द्वादशी
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र -पुनर्वसु 13.17 पर्यंत, नंतर पुष्य.
  • चंद्र राशी –  मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- चंदेरी)

संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळ जास्त होईल. आज टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत. भावंडात सामंजस्य राहील.

वृषभ – ( शुभ रंग- केशरी)

आवक पुरेशी असून तुमचा मूड छान राहील. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि अपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवारांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. मोजकेच बोला.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून तब्बेतीवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हौस मौज करण्यावर काही मर्यादा येतील. काही आवश्यक देणी द्यावी लागणार आहेत. तरुणांनी कुसंगत टाळावी. बचत आज जमणार नाही.

सिंह – ( शुभ रंग- सोनेरी)

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल.

कन्या – ( शुभ रंग-पिस्ता)

महत्त्वाकांक्षांचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होईल. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असू द्या. सर्वात आधी आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ – (शुभ रंग- भगवा)

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकलली तर बरे होईल. शासकीय कामे रखडणार आहेत. नोकरीत वरिष्ठ चक्क खोटी आश्वासने देणार आहेत. गृहिणींनी केलेल्या नवसाला आज देव पावेल.

वृश्चिक – ( शुभ रंग- पिवळा)

अंग मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. सासुरवाडी कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना स्टाईल मारू नका.

धनु – (शुभ रंग- निळा)

आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. अत्यंत व्यस्त दिवस असून पत्नीचे सल्ले फार उपयुक्त करणार आहेत. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – (शुभ रंग- हिरवा)

रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता दिसते. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. येणी वसूल होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग -तांबडा)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना विविध संधी चालून येतील. ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील.

मीन – (शुभ रंग- नारिंगी)

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ द्याल. आज थोडं मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.