Today’s Horoscope 24 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग (Today’s Horoscope 24 February 2024)
आजचा दिवस- शनिवार.
तारीख – 24.02.2024
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – मघा 22.21 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
—————————–
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज मौज मजेस तुमचे प्रथम प्राधान्य असेल. प्रकृती उत्तम साथ देईल.

वृषभ ( शुभ रंग- गुलाबी)
बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली असेल. मुले आज अभ्यास मन लावून करतील.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम )
अहंकारास अजिबात थारा देऊ नका. गोड बोलूनच अनेक अवघड प्रश्न मार्गी लावता येतील. शेजारी आपलेपणाने डोकावतील. आज महत्त्वाचे निर्णय अनुभवींच्या मार्गदर्शनाने घ्या.

कर्क – ( शुभ रंग – अबोली)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळवून स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण होईल. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील नवोदित मंडळींनाही योग्य मार्गदर्शन करू शकाल.

सिंह -( शुभ रंग – पिस्ता) (Today’s Horoscope 24 February 2024)
आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वतःचेच खरे करण्याकडे तुमचा कल असेल. आज तुम्ही अतिउत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याची गरज आहे. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील. अनपेक्षित घटना घडतील.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
एखाद्या नवीन उपक्रमाचा श्री गणेशा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून कामे लवकर उरकता येतील. काही अपुरी स्वप्न साकार होतील.

वृश्चिक ( शुभ रंग – पांढरा)
वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल. आज कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे. रिकामटेकड्या मित्रमंडळींना दुरूनच राम ठोका.

Pune : तालवाद्यांच्या त्रिवेणी सादरीकरणाने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाला सुरुवात

धनु (शुभ रंग- निळा)
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. नाकासमोर चालणेच हिताचे.

मकर (शुभ रंग- जांभळा)
आज कोणतीही धाडसाची कामे तसेच मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. कामगार वर्गाने स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. हातचे सोडून पळत्या मागे धावू नका.

कुंभ – (शुभ रंग- भगवा)
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. काही शुभ समाचार येतील.

मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील काही आरोग्य विषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला हिताचा राहील. आज तुम्ही कुणालाही सल्ले देऊ नका.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.