Today’s Horoscope 24 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग 

वार – मंगळवार.

24.01.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष- तिलकुंद एकादशी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- शततारका. 

चंद्र राशी –  कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

मिथुन ( शुभ रंग- जांभळा )

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. आज घरात थोरमंडळींशी काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)

आज दिवसाचा पूर्वार्ध मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपण्याचा प्रयत्न करा.

सिंह (शुभ रंग- लाल)

महत्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त रामराम करा. कोणताही व्यवहार नको.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी)

धंद्यातील येणी वसूल होतील. आज विरोधकांशीही गोड बोलून तुम्ही आपला स्वार्थ साधून घ्याल.   आज नोकरांना मात्र त्यांच्याच पायरीवर ठेवा. वैवाहिक जीवनात आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

तूळ ( शुभ रंग- क्रीम)

आज चैनी व विलासी वृत्ती         बळावेल उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. आज संध्याकाळी प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात रमाल.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा )

आज मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. स्थावर शेतीवाडी संबंधित काही अपुरे व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. प्रेम प्रकरणे आज डोक्याला फक्त मनस्ताप देतील.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

आज काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येईल.  रिकामटेकडी चर्चा आज वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात जुळलेले नवे हितसंबंध भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

कुंभ (शुभ रंग – मोतिया )

आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल. कदाचित क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी वादविवादाची शक्यता आहे. आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील.

मीन -(शुभ रंग – निळा )

आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. क्षुल्लक गोष्टी फारच मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फार मनावर घेऊ नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.