Today’s Horoscope 24 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – शुक्रवार.
2403.2023.
शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.
आज विशेष- गौरी तृतीया.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्विनी 13.22 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
आज तुम्ही जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. इतरांचेही विचार ऐकून घ्या कायद्याच्या चौकटीत रहा.
वृषभ (शुभ रंग- आकाशी )
असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. काही जण आज सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.
मिथुन ( शुभ रंग- निळा )
आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज जे पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडे जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
कर्क (शुभ रंग- मोरपंखी)
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या काही तक्रारी असतील त्या दुर्लक्षित करू नका.
सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागणार आहेत. वडीलधाऱ्यांना मात्र आज दुखावू नका.
कन्या ( शुभ रंग- क्रीम )
कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळायला हवा. आज कोणतेही धाडस करू नका फक्त नाकासमोर चला.
तूळ ( शुभ रंग- पांढरा)
कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना आज यशस्वीपणे कराल.
वृश्चिक (शुभ रंग- लाल)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तब्येत थोडी नरमच असेल.
धनु- (शुभ रंग- मोतिया)
काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.
मकर ( शुभ रंग- गुलाबी )
कौटुंबिक सदस्यात सामंजस्य असेल मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद असेल. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम वाढवावे लागतील.
कुंभ (शुभ रंग – मरून)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.
मीन -(शुभ रंग – केशरी )
उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व करू शकाल. तुमचा उत्साह पाहून विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल.