Today’s Horoscope 24 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

24.05.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते  1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- पुनर्वसु 15.06 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – मिथुन 08.27 पर्यंत नंतर कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तु व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत. मुले मन लावून अभ्यास करतील. आशादायी दिवस.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असू द्यावा.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )

आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित मृदुता ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास संभवतो

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे, सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक आज नमस्तेच घेतील.

सिंह (शुभ रंग- क्रीम )

काही जणांना आज अनपेक्षितपणे दूरचे प्रवास घडतील. कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून, तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी)

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल नोकरीत प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील आज व्यस्त दिवस असून कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा. स्वतःवर संयम असूद्या.

मकर ( शुभ रंग- भगवा )

भागीदारी तत्त्वावर एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असल्यास आजचा दिवस चांगला आहे. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदारही खंबीरपणे पाठीशी उभा राहील.

कुंभ (शुभ रंग – केशरी)

अगदी किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मीन -(शुभ रंग – मरून )

कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.