Today’s Horoscope 24 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… मंगळवार, ….. ​दि​. 24 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल –  उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा 15.32 पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा.
  • चंद्र राशी –  कुंभ 08.52 पर्यंत नंतर मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज काही आवश्यक खर्च करावे लागतील. बचतीचा विचार करणे आज तरी सोडून द्या. घरात थोर मंडळींच्या होला हो करा आणि विषय संपवा, वाद टाळा.

वृषभ – (शुभ रंग –  मरून)

वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. आज तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल. गृहिणींना आवडत्या छंदातूनही अर्थप्राप्ती होऊ शकते.

मिथुन – (शुभ रंग – डाळिंबी)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल, तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल, मित्र दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

कर्क(शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ आहेच.  रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील.

सिंह – (शुभ रंग – लाल)
घराबाहेर वावरतांना डोके जरा शांत ठेवायला हवे. आज तुम्हाला काही फसव्या संधी येण्याची शक्यता आहे.  हातची गोष्ट सोडताना विचार करा. आपल्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य द्या.

कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. विद्यार्थ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत. यश वाटते तितके सोपे नाही.

तूळ  (शुभ रंग – सोनेरी)
आरोग्यविषयक समस्या संभवतात. ज्येष्ठ मंडळींनी खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळाव्यात. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराच्या चुका काढू नका. कुठून येणी असतील तर मागायला लाजू नका.

वृश्चिक – (शुभ रंग – भगवा)
आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना आज प्रकृती उत्तम साथ देईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळी वेळेचे भान राहणार नाही.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. ब्युटीपार्लर, फोटोग्राफी, मॉडेलिंग यासारखे व्यवसाय आज तेजीत चालतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते.

मकर – (शुभ रंग – पिस्ता)
संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व दगदग जास्त होईल. भावंडात सामंजस्याची भावना राहील. गृहिणी आज घर स्वच्छतेचे फारच मनावर घेतील.

कुंभ – (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात तुमचा मान मान मतराब वाढेल. अनपेक्षित होणारे काही लाभ मनाला दिलासा देतील. आज अत्यंत छान दिवस असून, आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. वैवाहिक जीवनात तर आज तू तिथे मी.

मीन – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मनाच्या लहरीपणास थोडा लगाम गरजेचा आहे. अतिमहत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून तब्येतीकडे ही लक्ष देणे करणे गरजेचे आहे. आज एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार कराल.

( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.