Todays Horoscope 24 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 24.09.2021

  • शुभाशुभ विचार- 8 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष — संकष्ट चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – 08.54 पर्यंत अश्विनी नंतर भरणी.
  • चंद्र राशी – मेष

______________________

आजचे राशी भविष्य –

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

आज तुमच्या एखाद्या आवडत्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. पैशाची अडचण दूर होईल. आज जोडीदाराचे मन जिंकाल. कार्यक्षेत्रात विरोधकांनाही आपलेसे कराल.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढती राहिल. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. घरात थोरांशी मतभेद होऊ शकतात.

मिथुन – ( शुभ रंग – डाळिंबी)

आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील जे मनी योजल ते तडीस न्याल. इतरांनाही कामात मदत कराल. गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.

कर्क – ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरदारांना वरिष्ठांकडून आज सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्य निष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. कुटुंबीयांची मात्र नाराजी पत्करावी लागेल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)

मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. आज देवही नवसाला पावेल.

कन्या – (शुभ रंग- राखाडी)

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा अत्यंत कंटाळवाणा दिवस असून आज तुम्हाला एखाद्या सत्संगाची गरज भासेल.

तूळ – ( शुभ रंग – चंदेरी )

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. आज विरोधक माघार घेतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश वाटते तेवढे सोपे नाही. ज्येष्ठांनी क्षुल्लक वाटणारी दुखणी ही अंगावर काढू नयेत.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. गरजूना आपण होऊन मदत कराल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर – ( शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. मागण्या पूर्ण झाल्याने बच्चे कंपनी खुश असेल. आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून )

आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शेजार्‍यांशी असलेले मतभेद सुसंवादाने दूर होतील.

मीन – ( शुभ रंग- मोतिया )

तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव साथ देईल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन 9689165424.

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.