Today’s Horoscope 24 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 September 2022
शनिवार.
तारीख 24.09.2022
शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.
आज विशेष – शिवरात्री, चतुर्दशी श्राद्ध.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी- सिंह
————————————–
मेष – शुभ रंग- डाळिंबी
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा तुमच्या विरोधकांनाही हेवा वाटेल.

वृषभ- शुभ रंग- मोरपंखी
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज स्थावरची खरेदी विक्री लाभ देऊन जाईल. आज मातोश्रीचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

मिथुन- शुभ रंग- राखाडी
नवीन व्यवसायात आपली आर्थिक क्षमता ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

कर्क- शुभ रंग- क्रीम
प्रचंड आत्मविश्वास व वेळीच घेतलेले योग्य निर्णय याच्या जोरावर कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अडचणींवर सहज विजय मिळवाल.

सिंह -शुभ रंग- निळा – Today’s Horoscope 24 September 2022
कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. नोकरदार वरिष्ठांचा विश्वास संपादन करतील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. येणी असतील तर वसूल होतील.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी
आर्थिक व्यवहारात सतर्क असायला हवे आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. स्वतःच्या स्वार्थावर लक्ष केंद्रित करा, परमार्थ परवडणार नाही.

तूळ- शुभ रंग- निळा
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. आज मित्रांसाठी आपला मोठेपणा जपण्यासाठी तुम्ही काही न परवडणाराही खर्च कराल.

वृश्चिक- शुभ रंग- मरून
नोकरदारांचे बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील अधिकार योग चालून येतील पिताश्री आज अतिशय योग्य सल्ले देणार आहेत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा.

धनु- शुभ रंग- आकाशी
नोकरी धंद्यात काही विरोधी घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह न केलेला बरा. मनावर आज थोडा संयम ठेवा.

मकर- शुभ रंग -जांभळा
आजचा दिवस उद्योग धंद्याच्या दृष्टीने तिलकाचा अनुकुल नाही. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांनी इतर भानगडीत न पडता, सत्संगात रमावे.

कुंभ- शुभ रंग- मोतिया
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत. भागीदारीच्या व्यवसायात देणीघेणी चोख ठेवा.

मीन- शुभ रंग- हिरवा
आज नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील तब्येत मात्र थोडी नरमच राहील जुनी दुखणी अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद संध्याकाळी निवळतील.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.