Today’s Horoscope 25 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  शुक्रवार …. ​दि​.  25 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — १३ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – मोक्षदा एकादशी.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी ०७.१६ पर्यंत नंतर भरणी
  • चंद्र राशी – मेष.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग सोनेरी)
आज अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहेत. वेळीच घेतलेले योग्य निर्णय फायदेशीर ठरतील .

.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. काही झाले तरी कायद्याची चौकट मोडू नका.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा)
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.
कर्क-( शुभ रंग- पांढरा)
वाद विवादात आज तुम्ही स्वतःचे घोडे पुढे दामटवाल. मात्र आज एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका कारण तो पाळता येणार नाही. अधिकार वापरण्याच्या संधी येतील
 

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)
आज सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. आजचा खर्च योग्य कारणांसाठीच असेल. गृहिणींचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. उच्चशिक्षितांना विदेश गमनाचे वेध लागतील.

.

कन्या – ( शुभ रंग -चंदेरी)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल. झटपट लाभाचा मोह टाळावा लागेल.

तुळ – ( शुभ रंग- निळा)
आवक पुरेशी असेल. घरात अल्हाददायक वातावरण असेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येणार आहेत. वैवाहिक जीवनात चांगले मनोमिलन राहील.

वृश्चिक – (शुभ रंग -क्रीम)
नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांचे मूड सांभाळणे कठीण होईल. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांच्या हालचालींवर नजर असू द्या.

धनु – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)
आज सौंदर्यप्रसाधने, चैनीच्या वस्तूंची व्यवसाय तेजीत चालतील गृहिणी स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतील. रसिक मंडळी स्वतःच्या छंदास प्राधान्य देतील.

मकर – ( शुभ रंग – मरून)
आज तुम्ही फक्त स्वतःच्या प्रेमात रहाल, चैन करण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. आज मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण असेल. आज आईच्या शब्दास मान द्या.

कुंभ – ( शुभ रंग- जांभळा)
व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)
व्यवसायिक उलाढाल वाढेल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा होईल. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. आजचा अनुकूल दिवस सत्कारणी लावा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.