_MPC_DIR_MPU_III

Today’s Horoscope 25 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  गुरुवार, ​दि​.25 फेब्रुवारी 2021

_MPC_DIR_MPU_IV
  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – गुरुपुष्यामृत ( सूर्योदयापासून 13.17 पर्यंत.)
  •  राहू काळ – दुपारी 1.30  ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  पुष्य 13.17 पर्यंत नंतर अश्लेषा नक्षत्र.
  • चंद्र राशी –  कर्क.

आजचे राशीभविष्य

मेष –  ( शुभ रंग- मरून)

तुमचे मनोबल उत्तम असेल, आवक पुरेशी असेल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल.परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत.

वृषभ – ( शुभ रंग -राखाडी)

नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. तुमची काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे, कमीच बोला.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

कर्क – ( शुभ रंग- निळा)

हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे. जोडीदारास दिलेले शब्द पाळावे लागतील. काही मनाजोगत्या घटना उत्साह वाढवतील. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील.

सिंह – ( शुभ रंग- चंदेरी)

आवक-जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. खर्च मात्र आज टाळता येणार नाही. अति आत्मविश्‍वास मात्र घातक ठरेल. इतरांस मदत करताना आपली ही शिल्लक तपासा.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग -पांढरा)

प्रतिष्ठितांच्या ओळखीतून काही तरी फायदा होईल. दिवस लाभाचा असून अनेक अवघड कामे आज सोपी होतील. काही भाग्यवान नव्या घराचा ताबा घेतील. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

तूळ – (शुभ रंग- सोनेरी)

व्यवसायात प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी  उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. गृहिणींना क्षणभरही उसंत मिळणं कठीण आहे.

वृश्चिक – ( शुभरंग – स्ट्रॉबेरी)

आज केवळ स्वप्नरंजनापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. दैव तुमच्याच बाजूने असल्याने प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. कुणाला मोफत सल्ले देऊ नका.

धनु – (शुभ रंग -भगवा)

आज कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. वैवाहिक जीवनातील किरकोळ वाद फार ताणू नका. जोडीदारास फार प्रश्न न विचारणे हिताचे राहील. सासुरवाडी कडून काही लाभ संभवतो.

मकर – ( शुभ रंग -जांभळा)

व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणेच हिताचे राहील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. प्रवासात खोळंबा होईल.

कुंभ – ( शुभ रंग -गुलाबी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

मीन – (शुभ रंग- मोतीया)

तुमच्या कामातील उत्साह आज इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावेच लागणार आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.