Todays Horoscope 25 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 25.01.2022

  • शुभाशुभ विचार — क्षयदिन.
  • आज विशेष – कालाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा 10.54 पर्यंत नंतर स्वाती.
  • चंद्र राशी – तुळ

————————————

आजचे राशीभविष्य–

मेष – धंद्यातील आवक-जावक समान राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. कार्यक्षेत्रात समोर येणारी नवीन आव्हाने आनंदाने स्वीकाराल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी असेल.

वृषभ – ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाब्बासकिस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांचीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. अति आक्रमकतेने नुकसान होऊ शकते. काही येणी असतील तर वसूल होणार आहेत.

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी )

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. महत्वाकांक्षा वाढतील.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काही तरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. महिलांना जोडधंद्यातून चांगली कमाई होईल.

सिंह – (शुभ रंग – पांढरा )

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास प्राधान्य देतील.

कन्या- ( शुभ रंग- जांभळा )

मिळकत पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे हिताचे राहील. गृहिणी आज सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील. आनंदी दिवस.

तूळ- ( शुभ रंग – पिस्ता )

घराबाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीला प्राधान्य देणे गरजेचे राहील. स्वार्था वर लक्ष ठेवा परमार्थ झेपणार नाही.

वृश्चिक- ( शुभ रंग- भगवा )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी उद्यावर ढकला. अधिकारांचा गैरवापर टाळा.

धनु – ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील विवाहेच्छुकांना अनुरूप स्थळांचे प्रस्ताव येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होऊ शकतो.

मकर – (शुभ रंग- आकाशी )

मौज मजा करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड चुकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेस जपा. आज कायद्यात राहिलात तरच फायद्यात राहाल. तब्येतीकडे दुर्लक्ष महागात पडेल.

कुंभ (शुभ रंग -केशरी )

आज काही चुकीची माणसे तुमच्या संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल.

मीन – ( शुभ रंग तांबडा )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. आज नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकते सतर्क राहा.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.