Today’s Horoscope 25 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – गुरुवार 25 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार –19 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष –अमलकी एकादशी.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा 22.49 पर्यंत नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क 22.49 नंतर सिंह

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- राखाडी)

फक्त मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे पूर्ण दुर्लक्ष करा. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. कलाकारांना कामासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

वृषभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. घराबाहेर वावरतांना रागावर ताबा असावा. मोहस लगाम अत्यंत गरजेचा आहे. दुपारनंतर काहीजणांना तातडीने प्रवासास निघावे लागेल.

मिथुन – (शुभरंग- तांबडा)

व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल परिवारात सामंजस्य राहील. मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. आज काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील. गोडबोल्या मंडळीं पासून सतर्क रहा.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस आहे. विवाह विषयी बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. प्रवासात दगदग होईल.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

घरातील थोर मंडळी उपदेशांचे डोस पाजून तुम्हाला भलतेच बोअर करतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासणार आहे. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. इतरांना दिलेले शब्द पाळाल.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे  समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रातील काही क्षुल्लक अडचणी मुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल. आज नास्तिक मंडळीसुद्धा देवाला एखादा नवस ट्राय करतील.

धनु – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसली तरी अथक परिश्रमांना यश नक्की मिळेल.

मकर – ( शुभ रंग- लाल)

कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. हाऊस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी प्रमोशन च्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज तुमची काही येणी असतील तर वसूल होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.

मीन  – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही अगदी आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याच गोष्टी तुमच्या मनासारखा घडणार आहेत. मुलांची नम्र वागणूक तुम्हाला समाधान देईल. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.