Today’s Horoscope 25 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार…   बुधवार , ….. ​दि​. 25 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –  16 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – प्रबोधिनी एकादशी.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 18.20 पर्यंत नंतर रेवती.
  • चंद्र राशी – मीन.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग – मरून)

तरुणांनी मौज मजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे आवाक्याबाहेर जाणाऱ्या खर्चात कपात गरजेची आहे. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल.

वृषभ – ( शुभ रंग – राखाडी)

आज अत्यंत उत्साही व आनंदी असा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस अगदी उत्तम.

 

मिथुन (शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कर्क( शुभ रंग -डाळिंबी)

महत्त्वाचे निर्णय घेताना मनाची ओढाताण होणार आहे. अनुभवी व्यक्तींचे सल्ले विचारात घ्या. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

 

सिंह – ( शुभ रंग- लाल)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. विश्वासातल्या माणसाकडून ही विश्वास घात होऊ शकतो.

कन्या (शुभ रंग – गुलाबी)

आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस दुकानदारांच्या गल्यात वाढ होईल वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. प्रेम प्रकरणांना ग्रीन सिग्नल. खेळाडूंना अटीतटीची झुंज द्यावी लागेल.

तूळ  –  ( शुभ रंग – सोनेरी)

नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी आज दुर्लक्षित करू नका. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीस झटकून टाकलेल्या बऱ्या.

वृश्चिक ( शुभ रंग -आकाशी)

मित्रांमध्ये फक्त मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज तुम्ही कराल. मुलांच्या बाबतीत आज काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. कलाकार संधींचे सोने करतील.

धनु –  (शुभ रंग – भगवा)

प्रॉपर्टी विषयी काही रखडलेली कामे असतील तर त्यांना आज चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल.

मकर – ( शुभ रंग – पिस्ता)

भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा. आज जागा खरेदी विक्रीचे व्यवहार टाळावेत.

कुंभ  (शुभ रंग- मोरपंखी)

आज विविध मार्गाने लाभ होणार आहेत. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. अनेक क्लिष्ट कामे आज सोपी होणार आहेत. काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मीन ( शुभरंग- स्ट्रॉबेरी )

आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होऊन काही साधे निर्णय घ्यायला ही वेळ लागेल. वैवाहिक जीवनात तर पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.