Today’s Horoscope 25 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 November 2022
वार – शुक्रवार.
25.11.2022.
शुभाशुभ विचार – 17 पर्यंत चांगला
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- ज्येष्ठा 17.21 पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक 17.21 पर्यंत नंतर धनु.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- जांभळा )
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा.

वृषभ (शुभ रंग- केशरी)
विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकायला हवीत वाहन चालवताना बेसावध राहू नका.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )
आज चैनी व विलास वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. आज कोणत्याही कामातील तुमचा उत्साह दांडगा असेल.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतात. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. आज प्रेम प्रकरणात मात्र फसवणूक संभवते.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. रिकामटेकडी चर्चा आज वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)
धंद्यातील येणी आकस्मिक रित्या वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमचे मन काहीसे चंचल असेल अति उत्साहात घेतलेले काही निर्णय चुकू शकतात. प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी) – Today’s Horoscope 25 November 2022
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज गोड बोलूनच आपला स्वार्थ साधावा लागेल.

धनु- (शुभ रंग- भगवा)
आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. क्षुल्लक गोष्टही फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा मोफत सल्लागार मंडळींचे म्हणणे ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही.

Pune Crime : सराईत गुन्हेगाराचा खून करून पसार झालेला कुख्यात गुंड अटकेत

मकर ( शुभ रंग- गुलाबी )
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळीशी काही वैचारिक मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

कुंभ (शुभ रंग – मरून)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.

मीन -(शुभ रंग – निळा )
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस पूर्णपणे अनुकूल असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबिने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.