Today’s Horoscope 25 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…गुरुवार, दिनांक…24 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस.
  • आज विशेष … साधारण दिवस.
  • राहूकाळ…..सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल… पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र… पूर्वाषाढा 18.31 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • आजची चंद्र राशी… धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केवळ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे राहील. आज दैव तुमच्याच बाजूने आहे. शासकीय कामात मात्र खोळंबा होणार आहे.


वृषभ(शुभ रंग – तांबडा)
आज तुम्ही आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होतील पण फार ताणून धरू नका. सासरवाडीकडून काही लाभ होऊ शकतात.

 

मिथुन(शुभ रंग – पांढरा)
कारण नसताना इतरांच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रवासात थोडी रखडपट्टी होणार आहे.

 

कर्क – (शुभ रंग – हिरवा)
इतरांवर विसंबून न राहता आज स्वावलंबनाचे धोरण ठेवा. आज मामा- मावशीकडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील. काही जुन्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार आहेत.

 

सिंह – (शुभ रंग – पिस्ता)
आजचा तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. आज तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील. 

कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
वेळीच घेतलेले योग्य निर्णय आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशाचा मार्ग सोपा होईल. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. मुलांचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.


 

तूळ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नवीन झालेले परिचय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असून कुटुंबीयांसाठी वेळ देणे कठीण जाईल. गृहिणींचा शेजारी सलोखा वाढेल.


वृश्चिक
– (शुभ रंग – भगवा)
समाजातील तुमच्या पत प्रतिष्ठेत वाढ होईल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल.

 

धनु – (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रात आज तुम्ही स्पर्धकांवर अगदी सहजपणे मात कराल. आज आपलेच घोडे पुढे न दामटवता थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाणीत थोडी मृदुता असणे गरजेचे.

 

मकर – (शुभ रंग – निळा)
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून व्यावसायात आवक पुरेशी राहील. घरातील वडीलधार्‍या मंडळींशी काही मतभेद संभवतात. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील.

 

कुंभ(शुभ रंग – जांभळा)
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून अनेक अवघड कामे सोपी होणार आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात धनलाभ संभवतो.

 

मीन – (शुभ रंग – आकाशी)
उद्योग व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तुत्वास थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.