Today’s Horoscope 25 September 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 September 2022

 वार – रविवार.

तारीख 25-09-2022

शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.

आज विशेष – सर्वपित्री अमावस्या श्राद्ध.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी- सिंह 11.22 पर्यंत नंतर कन्या

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- मोरपंखी

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येऊ शकतात. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या.

वृषभ- शुभ रंग- पिस्ता

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दात देतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मिथुन- शुभ रंग- डाळिंबी

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तू वाहन खरेदीच्या वर्गातील अडचणी दूर होणार आहेत आशादायी दिवस. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

कर्क- शुभ रंग- गुलाबी

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत गोडवा ठेवला तर अनेक कामे सोपी होतील. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील.

सिंह -शुभ रंग- निळा

आज तुमची आर्थिक आवक पुरेशी राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. वाणीत मृदुता ठेवाल तर कित्येक कठीण प्रश्न मार्गी लावाल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वाला वाव मिळेल.

कन्या- शुभ रंग- सोनेरी

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. उपावरांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक तुमच्याशी नमते घेतील.

तूळ- शुभरंग- चंदेरी

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दुरच्या प्रवासास निघावे लागेल. रात्रीच्या प्रवासात जागेच रहा.

वृश्चिक- शुभ रंग- मोरपंखी

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

धनु- शुभ रंग- निळा

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे आवश्यक आहे. अत्यंत व्यस्त दिवस.

मकर- शुभ रंग -पिस्ता

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

कुंभ- शुभरंग- गुलाबी

कार्यक्षेत्रात कोणतेही धाडसाची कामे आज टाळा. आर्थिक व्यवहार कुवतिच्या बाहेर नको. गोडबोल्या मंडळींपासून आज दूर राहा. झटपट लाभाचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या.

मीन- शुभरंग- डाळिंबी

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील. धंद्यात भागीदारांशी सुसंवाद राहील.

 

 

         शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.