Today’s Horoscope 2 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 2 September 2022

वार – शुक्रवार

02.09.2022

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस

आज विशेष — साधारण दिवस

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल

आजचे नक्षत्र – विशाखा 23.47 पर्यंत नंतर अनुराधा

चंद्र राशी – तुळ 17.56 पर्यंत नंतर वृश्चिक

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)

आज आपल्या मर्यादेत रहा अति आक्रमकतेने नुकसान होईल.वैवाहिक जीवनात संध्याकाळनंतर शब्दांचा वापर कमीच  करा.मुलांनी कुसंगतीपासून लांब राहावे पालक हिताचे सांगत आहेत.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)

आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात.एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळे ही दूर झाल्याचे जाणवेल.तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे.काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल.सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल.एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल.सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी आनंदित होतील.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत.भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील.आज जरा मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ – (शुभ रंग- जांभळा)

आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल.आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात.अति सडेतोड बोलणे टाळा, त्यामुळे नाती दुरावतील.

वृश्चिक – (शुभ रंग – मरून)

आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल.गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल.आज तुमचे मन काहीसे चंचल असेल.एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.

धनु – (शुभ रंग – भगवा)

जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल.गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल.प्रवास होतील.प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मकर – (शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)

आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.

मीन – (शुभ रंग – मोतीया)

कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल.वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.वादविवादात आज तटस्थ रहा.थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.