Today’s Horoscope 26 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 26 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- सोमवार.

तारीख – 26.02.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 8.11 पर्यंत नंतर कन्या.

—————————–

मेष – ( शुभ रंग – पांढरा)

कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. आज कोणालाच काही सल्ले न देता स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य देणे हिताचे राहील.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

आज अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. एखादा नवीन विषय शिकून घेण्याकडे आज तुमचा कल असेल.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी )

आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील नवोदितांना प्रयत्न वाढवावे लागतील.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)

आज तुम्ही घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांच्या नादी लागून जे पटत नाही ते करू नका. प्रवासात नवे संबंध जुळून येतील.

सिंह -( शुभ रंग – हिरवा)

आज खिशात पैसा खेळता राहील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. नाती जपायची असतील तर आज जरा अति स्पष्टवक्तेपणाला आवर घाला.

कन्या – ( शुभ रंग- मरून)

आज काही मनासारख्या झालेल्या घटना तुमच्या कामातील उत्साह वाढवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आज तुम्ही इतरांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्थी करू शकाल.

तूळ- ( शुभ रंग- निळा)

आजचा दिवस खर्चाचा आहे. तुम्हाला काटकसर जमणार नाही. मनसोक्त खर्च कराल. ज्येष्ठांची अध्यात्माकडे रुची वाढेल तरुणांच्यात विलासी वृत्ती बळावेल.

वृश्चिक- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आजचा तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस असून एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.

धनु- (शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे दडपण राहील. आज बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. व्यावसायिक मंडळी वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

मकर- (शुभ रंग- जांभळा)

सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. श्रद्धाळू गृहिणींचा देवधर्म चालूच राहील. आध्यात्मिक मार्गात असाल तर तुम्हाला एखादी दिव्य प्रचिती येईल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घरात जोडीदाराच्या मतास प्राधान्य देणे हिताचे.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. घरात जोडीदाराच्या कलाने घ्या.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.