Today’s Horoscope 26 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 January 2023
वार – गुरुवार.
26.01.2023
शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.
आज विशेष- गणराज्य दिन, वसंत पंचमी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा 20.05 उत्तरा भाद्रपदा 18.57 पर्यंत नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
—————————————-
मेष (शुभ रंग – मरून)
आज काही ज्येष्ठ मंडळी तीर्थक्षेत्री प्रवासास निघतील. काही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होतील. आज दिवस खर्चाचा असून दानी मंडळी यथाशक्ती दानधर्म करतील.

वृषभ (शुभ रंग – जांभळा)
आज कार्यक्षेत्रात पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. दुरावलेल्या नात्यातील काही गैरसमज दूर होऊन एकोपा वाढेल. नवविवाहितांची स्वप्न साकार होतील.

मिथुन (शुभ रंग – आकाशी)
नोकरदारांना आज मान मोडून काम करावे लागणार आहे. वरिष्ठांचे मूड सांभाळावेच लागतील. तरुणांना थोरांचे विचार पटणार नाहीत. वडील आज योग्य तेच सल्ले देतील.

कर्क (शुभ रंग – स्ट्रॉबेरी) – Today’s Horoscope 26 January 2023
आज तुमचा देव धर्माकडे कल राहील. नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलून बघतील. घरात मोठ्यांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. कायद्याचे भान आवश्यक.

सिंह (शुभ रंग – लाल)
आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही फसव्या संधी खुणावतील. ताकही फुंकून त्यावे असा दिवस असून आज हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. वैवाहिक जीवनातही फार अपेक्षा नकोत.

कन्या (शुभ रंग – डाळिंबी)
आज एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. वक्ते सभा गाजवतील. आज नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती सकारात्मक रित्या पार पडतील.

तूळ (शुभ रंग – क्रीम)
आज तुमचे मनोबल जरा कमीच असून तब्येतही नरम असेल. कार्यक्षेत्रातील काही मनाविरुद्ध घटना आज तुम्हाला बेचैन करतील. नोकरीत बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे.

वृश्चिक (शुभ रंग – हिरवा)
हौशी मंडळींना चैन करण्यासाठी आज पुरेसा पैसा उपलब्ध होईल. काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. कलाकार लोकप्रियतेचा अनुभव घेतील.

धनु (शुभ रंग – पांढरा)
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागणार आहे. पालकांनी मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हीताचे.

मकर (शुभ रंग – पिस्ता)
आज काही अति हुशार मंडळी तुमच्या संपर्कात येतील. कमीच बोलणे हिताचे राहील. काही जणांना तातडीने प्रवासास निघावे लागेल मुलांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमची आर्थिक बाजू बळकट असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचाही चांगला प्रभाव पडेल. उपवारांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. आशादायी दिवस.

मीन (शुभ रंग – लाल)
खर्च कितीही वाढला असला तरी आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित रित्या वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी आज थोडी भटकंती होईल.

शुभम भवतु

जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
संपर्क 9689165424

Padma Puraskar : महाराष्ट्राचे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.