Todays Horoscope 26 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरूवार, दि. 26.05.2022

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – अपरा एकादशी.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती 24.38 पर्यंत नंतर अश्विनी.
  • चंद्र राशी – मीन.

________________________

आजचे राशीभविष्य- 

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

वृषभ -(शुभ रंग- जांभळा)

आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज तुमच्या सामाजिक मानसन्मानात वृद्धि होईल. उत्तम दिवस.

मिथुन-( शुभ रंग- मोरपिशी)

आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवणे गरजेचे. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी नियमांच्या बाहेर जाऊ नये.

कर्क-( शुभ रंग -डाळिबी)

आज दिवस तितकासा अनुकूल नाही. थोडा संयम ठेवा. नोकर दारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

सिंह-( शुभ रंग- सोनेरी)

आज घाईगर्दी घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. आपल्याला जास्त काही कळत नाही त्यात उगीचच नाक खुपसू नका.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल. मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. आज जिभेचे चोचले पुरवू नका पोट बिघडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक-( शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

धनु- ( शुभ रंग- क्रीम)

वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

मीन- ( शुभ रंग- मरून)

आज मित्रपरिवारात व आप्तस्वकीय मंडळीत तुमच्या शब्दाचा मान राहील. परंतु भावनेच्या भरात मात्र कुणाला शब्द देऊ नका. उपवर असाल तर एखाद्या विवाहसोहळ्यात तुमचे सुत जुळू शकेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.