Today’s Horoscope 26 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

26.05.2023.

शुभाशुभ विचार- वृद्धी दिन.

आज विशेष- साधारण दिवस

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00. 

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – आश्लेषा 20.50 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 20.50 पर्यंत नंतर सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना आज यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागणार आहे गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही. व्यस्त दिवस.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज कोणतेही काम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करा. आज आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा

मिथुन ( शुभ रंग- निळा )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही मत ऐकून घ्या.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज घरात वडीलधाऱ्यांचे मुड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.

तूळ ( शुभ रंग- मोरपिशी )

नोकरीच्या ठिकाणी हाताखालची मंडळी तुमच्याशी आदबीने वागतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

 नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करायला हव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेकही आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

कोणतीही नवीन उपक्रम सुरू  सुरू करण्यासाठी आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद होतील. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागले तरी फार आवाज होणार नाही.

मकर ( शुभ रंग- मरून )

आज तुमच्या कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगली सूर जुळतील.

कुंभ (शुभ रंग – लाल )

आज तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी  असतील तर अनपेक्षितपणे वसूल होतील. प्रवासात मात्र सावध राहायला हवे.

मीन -(शुभ रंग – पांढरा )

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रातील नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.