Today’s Horoscope 26 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… गुरुवार. , ….. ​दि​. 26 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – भागवत एकादशी.
  • राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती २१.२० पर्यंत नंतर  अश्विनी.
  • चंद्र राशी –  मीन २१. २० पर्यंत. नंतर मेष.

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – राखाडी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील, हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल, पण तसे न करणे हिताचे राहील. बरेच दिवसांनी काही दूरचे नातलग संपर्कात येतील.

वृषभ – (शुभ रंग- मरून)

योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.

 

मिथुन ( शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतात. आज मित्रांच्या फार नादी लागू नका, फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करा.

कर्क(शुभ रंग – चंदेरी)

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे आज निस्वार्थीपणे करावी लागणार आहेत. दानधर्म करताना आपली मिळकत ही विचारात घेणे गरजेचे.

 

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)

कसलेही नवे उपक्रम सुरू करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचा हि अतिरेक टाळा. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा, विश्रांतीही गरजेची आहे.

कन्या ( शुभ रंग – आकाशी)

धंद्यात आवक-जावक सारखीच राहील. नवे परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

तूळ  – (शुभ रंग- सोनेरी)

अधिकारी वर्गाला हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज खेळाडूंचा स्पर्धेतील विजय नक्की

वृश्चिक  – ( शुभ रंग- आकाशी)

मित्रांमध्ये केवळ मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज आपण कराल. मुलांच्या बाबतीत आज काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत.

धनु (शुभ रंग – भगवा)

प्रॉपर्टी विषयी काही कामे रखडलेली असतील तर अशा कामांना चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात डोकवावे लागणार आहे.

मकर – ( शुभ रंग- पिस्ता)

अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर निपटून टाकणे हिताचे राहील. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून बाकी सर्व काही सुचेल.

कुंभ  (शुभ रंग- मोरपंखी)

आज विविध मार्गाने लाभ होणार आहेत. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. अनेक क्लिष्ट कामे आज सोपी होणार आहेत. काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मीन – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)

आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होईल. काही साधे निर्णय घ्यायला ही तुम्हाला बराच वेळ लागेल. पत्नी म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.