Today’s Horoscope 26 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…शनिवार, दिनांक…26 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस.
  • आज विशेष … साधारण दिवस.
  • राहूकाळ…..सकाळी 09.00 ते 10.30 
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… उत्तराषाढा 19.26 पर्यंत नंतर श्रवण.
  • आजची चंद्र राशी… मकर.

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – क्रीम)

कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून तुम्ही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. योग्य वेळी अधिकार वापरावेच लागणार आहेत.


वृषभ(शुभरंग – स्ट्रॉबेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. नवीन व्यावसायिकांनी आर्थिक धाडस टाळावे. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

 

मिथुन (शुभ रंग- हिरवा )

आज अतिआक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. ताकही फुंकून प्यावे, असा आजचा दिवस. विश्वासातल्या माणसाकडून ही विश्वासघात संभवतो.

 

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. महत्वाच्या चर्चा सकारात्मकतेने पार पडतील. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

 

सिंह(शुभ रंग -गुलाबी )

आपल्या कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या कारवाया वाढलेल्या आहेत. हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. काही शत्रू मित्रांमध्येच लपले असण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.

कन्या(शुभ रंग- सोनेरी )

कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. गृहिणी घर सजावटीसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतील.

तूळ – (शुभरंग – मोतिया)

आपले कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. विद्यार्थी मान मोडून अभ्यास करतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल.


वृश्चिक
– (शुभ रंग -मोरपंखी )

आज तुमचा बराचवेळ घराबाहेरच जाणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. आज भावंडांमध्ये सामंजस्य राहील. जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 

धनु – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रातील पूर्वीच्या श्रमाचे चीज होईल. दुरावलेली काही नाती जवळ येतील. नेतेमंडळींचा जनमानसावर प्रभाव राहील. खिशात पैसा खेळता असल्याने मनासारखी चैन करता येईल.

 

मकर – (शुभ रंग – चंदेरी)

तरुणांनी आज मौजमजा करताना कायद्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य द्यायला हवे. नवीन झालेले परिचय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

 

कुंभ(शुभ रंग – नारिंगी)

व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. आज तुम्हाला काही कर्जाचे हफ्ते फेडावे लागणार आहेत. घरात वडिलधाऱ्या मंडळींचे उपदेश चालूच राहतील.

 

मीन – (शुभ रंग- केशरी)

तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असा हा आजचा दिवस सत्कारणी लावा. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्याची भावना राहील. विवाहाच्या प्रतीक्षेत असाल तर योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.