Today’s Horoscope 26 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 September 2022
सोमवार.
तारीख 26.09.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – घटस्थापना.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- हस्त.
चंद्र राशी- कन्या.
————————————–
मेष – शुभ रंग- पांढरा
कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग यशस्वीपणे सोडवाल. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतीलच. भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावे.

वृषभ – शुभ रंग – डाळिंबी
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करून मोकळे व्हा. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदीत व्हाल.

मिथुन – शुभ रंग – पिस्ता
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा आज जपूनच वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका मुलांचे अति लाड थांबवा.

कर्क- शुभ रंग – मोरपंखी – Today’s Horoscope 26 September 2022
नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल. कुटुंबीयांना अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल.

सिंह – शुभ रंग – आकाशी
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल तर तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

कन्या – शुभ रंग – सोनेरी
आज तुम्ही जरा हट्टी पणाने वागाल. सडेतोड बोलण्याने आपलीच काही माणसे दुखावली जातील आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची ऊधळपट्टी नको

तूळ – शुभ रंग – चंदेरी
आज तुमच्याकडे विविध मार्गाने पैसा येईल. पण खर्चाचे ही विविध मार्ग तयारच असतील लांबच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधली तर सापडेल.

वृश्चिक – शुभ रंग – मोरपंखी
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरणार आहेत मित्र दिलेली आश्वासने पाळतील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या.

धनु – शुभ रंग – निळा
उच्चशिक्षिताना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस. कार्यक्षेत्रात यश जवळच येऊन ठेपले आहे.

मकर – शुभ रंग – गुलाबी
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांती मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल,कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

कुंभ- शुभ रंग- चंदेरी
कार्यक्षेत्रात घडलेल्या काही विरोधी घटनांनी तुम्हाला आज नैराश्य जाणवेल. आज वरिष्ठांशी नमते घ्या आणि सहकार्यांशी जुळवून घ्या. दर शनिवारी मारुती दर्शन घ्यायला विसरू नका.

मीन – शुभरंग – मरून
आज तुम्ही आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून मुलांनी कुसंगती पासून लांब रहावे पालक आज हिताचेच सल्ले देतील.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Balewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.