Todays Horoscope 27 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – सोमवार, दि. 27.06.2022 (Todays Horoscope 27 June 2022)

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – शिवरात्री.
  • राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी 16.02 पर्यंत नंतर मृग.
  • चंद्र राशी – वृषभ

_________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 27 June 2022)

मेष – (शुभ रंग- पांढरा)

तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. कुणाला दिलेले शब्द पळता येतील. अनावश्यक खर्चाला आवर घालायला हवा. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणाच कामी येईल प्रलोभने टाळा.

वृषभ – (शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. भावंडात काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. पण यावर सुसंवादाने मार्ग निघेल. मात्र तडजोड करावीच लागेल.

मिथुन – (शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. घरातील थोर मंडळी आज सामंजस्याने वागतील. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क – (शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.

सिंह – (शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. कार्यक्षेत्रात काही बिकट समस्या सहज सोडवाल.

कन्या – (शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींची आज सत्संगाकडे पावले आपोआप व वळतील.

Chakan Crime : गळा आवळून अल्पवयीन तरुणीचा खून

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय बदललेला बरा.

वृश्चिक – (शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – (शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.

मकर – (शुभ रंग- क्रीम)

काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. रसिक मंडळी आज जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील. आरोग्याची साथ राहील.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आज पैसा कितीही आला तरी कमीच पडेल मुलांचे लाड आवरते घ्या त्यांच्या शिस्तीस प्राधान्य द्या.

मीन – ( शुभ रंग – मरून )
आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होईल. मातोश्रींशी थोडेफार मतभेद संभवतात. व्यस्त दिवस.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.