Today’s Horoscope 27 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शनिवार 27 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष –साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र — 19.52 पर्यंत पूर्वा फाल्गुनी, नंतर उत्तरा.फाल्गुनी
  • चंद्र राशी – सिंह.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- पिस्ता)

आज पैसा येणे इतकेच पैसा जाण्याचे ही मार्ग प्रशस्त असतील. चैनी व विलासी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. घर खरेदी विक्री चे व्यवहार फायदेशीर ठरतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)

आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. गृहिणींना आज क्षणभरही उसंत मिळणार नाही

मिथुन –( शुभ रंग – राखाडी )

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहावे.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. आज तुम्हाला मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.

सिंह – (शुभ रंग – हिरवा )

भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. आज तुम्ही कुटुंबियांना अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी कराल.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)

आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. रसिक मंडळी आज कामावर दांडी मारूनही थोडं करमणुकीस प्राधान्य देतील.

तूळ – ( शुभ रंग- नारिंगी)

नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. जिवलग मित्र आज हिताचे सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. ज्येष्ठ मंडळींना संततीकडून सुवार्ता येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – केशरी )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्ण कराल. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. शब्दांचा वापर गरजेपुरता करा.

धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)

वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोड्याफार कटकटी होतील पण त्यातून सामंजस्याने मार्ग काढाल. आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. त्यातून चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन  – ( शुभ रंग- गुलाबी)

आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद संभवतात. सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी करा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.