Today’s Horoscope 27 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार

27.03.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस

राहू काळ – सकाळी 7.30  ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी 15.27 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आवक भक्कम असल्याने वाढत्या खर्चातही कपात करण्याची गरज भासणार नाही. प्रिय पाहुणे आज घरी पाय धुळ झाडतील. नेतेमंडळी आज सभा गाजवतील.

वृषभ (शुभ रंग- तांबडा )

आज तुम्ही अतिउत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यावे. उपवारांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल आज गरजेपुरते आध्यात्मिक व्हाल.

कर्क (शुभ रंग- पिवळा.)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस जसे चिंताल तसे होईल. कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी )

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.

कन्या ( शुभ रंग- निळा)

दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. आज मन प्रसन्न राहील.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे जाणे योग्य ठरणार नाही. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आज ताकही थुंकूनच प्या.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची खंबीर साथ राहील.

धनु- (शुभ रंग- गुलाबी)

कोणतीही गोष्ट सहज मिळणार नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोपत राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. कंजूषणावर लगाम घालून आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)

कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे आज तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष घालतील.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी )

शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन एकोपा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम असू द्या.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.