Todays Horoscope 27 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 27.05.2022

  • शुभाशुभ विचार – 12 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी.
  • चंद्र राशी – मेष.

________________________

आजचे राशी भविष्य –

मेष – (शुभ रंग- जांभळा)

आज तुमच्या एखाद्या आवडत्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. स्वतःची हौस मौज पुरवण्यासाठी सढळहस्ते पैसे खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ – (शुभ रंग- निळा)

व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढती राहिल. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. घरात थोरांशी मतभेद होऊ शकतात.

मिथुन – (शुभ रंग – डाळिंबी)

आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील जे मनी योजल ते तडीस न्याल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळणार आहे.

कर्क – (शुभ रंग- मोरपंखी)

नोकरदारांना वरिष्ठांकडून आज सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्य निष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील.

सिंह – (शुभ रंग- गुलाबी)

मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. इतरांच्या भानगडीत मात्र डोकावू नका.

कन्या – (शुभ रंग- राखाडी)

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा अत्यंत कंटाळवाणा दिवस असून वैवाहिक जीवनातही किरकोळ वाद संभवतात पण फार ताणू नका.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळणे हिताचे राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात आज तुम्ही स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश वाटते तेवढे सोपे नाही. ज्येष्ठांनी क्षुल्लक वाटणारी दुखणी ही अंगावर काढू नयेत.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. गरजूना आपण होऊन मदत कराल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल.

मकर – (शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

आज काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. गृहिणींचा जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. शब्द जपून वापरा व वाद टाळा.

मीन – (शुभ रंग- मोतिया)

तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील. सामाजिक कामे करणाऱ्यांना लोकांचा आदर मिळेल. परिवारासाठी वेळ देणे मात्र कठीण जाईल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.