Todays Horoscope 27 May 2023 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज – Todays Horoscope 27 May 2023 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य –

आजचे पंचांग –
वार – शनिवार
27 .05.2023.
शुभाशुभ विचार- भर्द्रा वर्ज्य दिवस.
आज विशेष- साधारण दिवस
राहू काळ – सकाळी .00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 23.43 पर्यंत नंतर पूर्वा.
चंद्र राशी – सिंह.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौसेने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. विद्यार्थी अभ्यासास प्राधान्य देतील.

वृषभ (शुभ रंग- निळा )
आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहणी स्वतःच्या छंदास प्राधान्य देतील. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृहसौख्य लाभेल.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणींना शेजार धर्म पाळावे लागतील. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज फायदेशीर ओळखी होतील.

कर्क (शुभ रंग- भगवा)
धनस्थानातील चंद्र भ्रमण आवक वाढवेल आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील, छान दिवस.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. व्यवसायातील स्पर्धेत सकारात्मकतेने तोंड द्याल इतरांस दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी )
आज तुम्ही काहीसे लहरीपणे वागाल. कुठेही आपलीच मर्जी चालवायचा तुमचा प्रयत्न राहील. तरुणांना प्रलोभाने आकर्षित करतील. आज थोडासा संयम बाळगायची गरज आहे.

तूळ ( शुभ रंग- भगवा )
आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी काही खर्चही कराल. आज हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही भर द्याल.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ शंभर असेल. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मकर ( शुभ रंग- पांढरा )
जे चाललंय तेच बरं चाललंय कमी श्रमात जास्त लाभाचा मोह करू नका. धाडसाची कामे आज टाळलीत तर बर होईल. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

कुंभ (शुभ रंग – मरून )
आज वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल.

मीन -(शुभ रंग – मोतिया )
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढती च्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की लाभेल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.