Today’s Horoscope 27 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… शुक्रवार, ….. ​दि​. 27 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – 08 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 10.30  ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी 24.23 पर्यंत नंतर भरणी.
  • चंद्र राशी – मेष.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोतिया)
आज तुमची तब्येत जरा नरमच राहील, मानसिक स्थिती कमकुवत असेल. आज कोणतीच रिस्क घेऊ नका. कलेच्या क्षेत्रात नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. तरीही सर्व महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करून मोकळे व्हा. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्येच काहीतरी मतभेद होतील.

मिथुन – (शुभ रंग – केशरी)
जीवाची मुंबई करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. मित्र तुमच्या शब्दास मान देतील. उच्चशिक्षित असलात तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल.

कर्क(शुभ रंग – हिरवा)
वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकीनऊ येतील.

सिंह – (शुभ रंग – मरून)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
तरुणांनी कुसंगती पासून लांबच रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मध्ये आज तरी कोणतीही रिस्क घेऊ नका.

तूळ – (शुभ रंग – क्रीम)
आज काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. गृहिणींना आवडत्या छंदातून धनप्राप्ती होईल, वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

वृश्चिक (शुभ रंग – मोरपंखी)
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळणे हिताचे राहील. नोकरीच्या ठिकाणी फक्त स्वतःचे काम करुन मोकळे व्हा. फार खोलात शिरून नका.

धनु (शुभ रंग – केशरी)
महत्त्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल. आज सहकुटुंब एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. काही अनावश्यक खरेदी होईल.

मकर – (शुभ रंग – जांभळा)
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवायला हवेत. गृहिणींना अनपेक्षित पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल.

कुंभ – (शुभ रंग – चंदेरी)
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत. आज मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. वाहनचालकांना बेशिस्त वागणुकीचा दंड भरावा लागेल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
आज अपेक्षितपणे काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहिणींना अनेक जाहिराती भुरळ घालतील.

( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.