Todays Horoscope 27 October 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 27.10.2021

  • शुभाशुभ विचार – 11 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 12.00  ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आर्द्रा 07.08 पर्यंत नंतर पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन.

—————————————

आजचे राशीभविष्य-

मेष – ( शुभ रंग -पिस्ता )

ज्येष्ठ मंडळी आज सहलीचे बेत आखतील. कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर सह्या करताना आज सतर्क राहायला हवे. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत यश वाटते तितके सोपे नाही.

वृषभ – ( शुभ रंग -राखाडी )

विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. बेरोजगारांची वणवण थांबेल.

मिथुन – ( शुभ रंग -पांढरा )

आज अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात मात्र खोळंबा होईल.

कर्क – ( शुभ रंग- जांभळा )

आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील काही अटीतटीचे प्रसंग आज चतुराईने सोडवावे लागतील. हाती असलेले पैसे जपूनच वापरा.

सिंह – ( शुभ रंग- क्रीम )

मित्र आज दिलेली आश्वासने नक्की पाळतील. क्षुल्लक कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हाती असलेले पैसे जपूनच वापरा. संध्याकाळी एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या – ( शुभ रंग – निळा )

उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे. घरातील थोरांचे सल्ले अवश्य घ्या. त्यांच्या वयाचा मान राखा.

तुळ – ( शुभ रंग – गुलाबी )

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. आज तुम्ही गरजूंना मदत करणार आहात. आपल्याही मिळकतीचा अंदाज घ्या.

वृश्चिक- ( शुभ रंग- मोतिया)

आज व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- सोनेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. वाढीव जबाबदाऱ्या सकारात्मकतेने स्वीकाराल. आज जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत.

मकर – (शुभ रंग – भगवा)

आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तिस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कुंभ – ( शुभ रंग – डाळिंबी )

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. नवे परिचय होतील. आज घर सजावटीसाठी मौल्यवान खरेदी कराल. मुलांना शिस्त लावावी लागेल.

मीन – (  शुभ रंग – केशरी)

कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. आज आनंदाच्या भरात कुणाला ही वचने देऊ नका ती पाळता येणार नाही. मुलांचा अभ्यासात आनंदी आनंद असेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.