Today’s Horoscope 27 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

27.09.2023.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष- प्रदोष.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – धनिष्ठा 07.10 पर्यंत नंतर शततारका.

चंद्र राशी – कुंभ.

————————————

मेष ( शुभ रंग- मोरपंखी )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

वृषभ (शुभ रंग- निळा )

उच्च अधिकारी असाल तर अधिकार वापरावे लागतील. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. अतिव्यस्त दिवस आहे

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

कर्क (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रात आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोतच. गोडबोल्या मंडळींपासून सावध राहा. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम गरजेचा.

सिंह (शुभ रंग- लाल )

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी)

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल. मौजमजा करताना कायद्याचे बंधन पाळा.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी )

विविध मार्गाने आलेल्या पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही गरजूंनाही मनापासून मदतीचा हात द्याल. आज सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात मान मिळेल.

मकर ( शुभ रंग- भगवा )

खर्च वाढता असला तरी तुमची काही येणी ही आज अकस्मिक पणे वसूल होतील. त्यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही. नेतेमंडळी आज सभा गाजवतील.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपवरांना आज योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमतेच घेतील.

मीन -(शुभ रंग – गुलाबी)

कौटुंबिक गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षितपणे दूरचे प्रवास घडणार आहेत.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.