Today’s Horoscope 28 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  सोमवार …. ​दि​.  28 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार –सामान्य दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी १५.३९ पर्यंत नंतर मृग.
  • चंद्र राशी –  वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. नवीन चांगले हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करू शकाल. लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल. महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल आज कुणी केलेल्या खोट्या स्तुतीनेहि तुम्ही भारावून जाल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

नवीन व्यावसायिकांनी आर्थिक धाडस करताना आपली कुवत ओळखावी गुंतवणूक करतानाही तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. आज कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

योग्य वेळी घेतलेले अचूक निर्णय व वेळेचे योग्य नियोजन, याच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.  ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवास घडतील.
 

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)

आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. तुमचा आत्मविश्वास व स्वावलंबन कामी येईल. विरोधक ही आता मैत्रीचा हात पुढे करणार आहेत. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस

कन्या – (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खूष आहेत अशा भ्रमात राहू नका. हाताखालच्या लोकांशीही मैत्रिपूर्ण संबंध असणे गरजेचे आहे. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

तुळ – ( शुभ रंग- निळा)

कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. आज काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडणार आहेत. कोणतीही रिस्क नको. आज देव गाऱ्हाणे ऐकेल.

.

वृश्चिक – (शुभ रंग- क्रीम)

कोणत्याही क्षेत्रात असला तरी आज स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंनाही अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. झटपट लाभाचा मोह परवडणार नाही.

धनु – (शुभ रंग स्ट्रॉबेरी)

बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगार वर्गाच्या रास्त मागण्या मान्य होतील. आज दगदग टाळा.  वैवाहिक जीवनात सामंजस्याचे वातावरण राहील.

मकर – (शुभ रंग – मरून )

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. कदाचित संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

कौटुंबिक सदस्यांत सामंजस्याची भावना राहील. गृहिणी आज स्वतःच्या आवडीस प्राधान्य देतील. मुले पूर्णपणे पालकांच्या आज्ञेत राहतील. अनुकूल दिवस.

मीन – (शुभ रंग- मोरपंखी)

दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे असे काहीतरी वेगळेच करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज आईच्या प्रकृतीची विचारपूस करा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.