23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Todays Horoscope 28 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

spot_img
spot_img

आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 28.06.2022 (Todays Horoscope 28 June 2022)

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – दर्श अमावस्या
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग 19.05 पर्यंत नंतर आर्द्रा.
  • चंद्र राशी – मिथुन.

_________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 28 June 2022)

मेष – (शुभ रंग- तांबडा)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा.

वृषभ – (शुभ रंग – मोतिया)

आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे. आज स्पर्धा जिंकाल.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)

नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतक दुरावण्याची शक्यता आहे. कर्तव्यासही प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Sangli Mass Suicide : आत्महत्या नव्हे हत्याकांड; 9 जणांच्या सामूहिक मृत्यूचा लागला शोध

तुळ – (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची आणि होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर – (शुभ रंग- निळा)

नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.

कुंभ – (शुभ रंग- भगवा )

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज घरून ग्रीन सिग्नल मिळेल.

मीन – (शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424

( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

spot_img
Latest news
Related news