Today’s Horoscope 28 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 March 2023
वार – मंगळवार.
28.03.2023
शुभाशुभ विचार- 19 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 17.32 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-
मेष (शुभ रंग – लाल)
आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. घर दुरुस्तीच्या काही कामात लक्ष घालावे लागणार आहे. प्रॉपर्टी खरेदी विक्री सारखे मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा.

वृषभ (शुभ रंग – पिस्ता)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. लहान भावास आज तुमच्या मदतीची गरज भासेल.

मिथुन ( शुभ रंग- लेमन )
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. अति स्पष्ट बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक आवक जरी चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
पैसा येण्याआधीच पैसा जाण्याचे मार्ग तयार असतील. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी पुन्हा शोधल्यास सापडेल.

सिंह (शुभ रंग- निळा )
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र आज तुम्हाला दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)
उच्चशिक्षित तरुणांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज कुणीही दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. मित्रांना दुरून रामराम करा.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल चालूच राहील. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा) Today’s Horoscope 28 March 2023
कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या काही घटना तुम्हाला बेचैन करतील. आज वरिष्ठानशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ संभवतो.

धनु (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही आपल्या मर्यादित रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे, पालक तुम्हाला हिताचेच सल्ले देतील.

मकर ( शुभ रंग- मरून )
कार्यक्षेत्रात आज काही पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतील. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

कुंभ (शुभ रंग – लाल)
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून या रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.

मीन (शुभ रंग – सोनेरी)
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. हाती असलेला पैसा जपून वापरा मुलांचे ही अति लाड थांबवा. गुरुंनी आज घर आवरण्याचे मनावर घेतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune Corona : पुण्यात कोरोनाचा कहर;आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.