Todays Horoscope 28 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 28.05.2022

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – शिवरात्री.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – भरणी
  • चंद्र राशी –  मेष.

__________________________

आजचे राशी भविष्य –

मेष- ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल भावनेच्या भरात मात्र काही चुकीचे निर्णय घ्याल. दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. आज जोडीदाराचे मन जिंकाल.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)

उद्योग व्यवसायात काही तत्त्वांना मुरड घालावी लागेल आज प्रवास करणार असाल तर प्रवासात सावध राहा. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. वाहतुकीचे नियम मोडाल तर दंड चुकणार नाही

मिथुन-( शुभ रंग – डाळिंबी)

आज दुरावलेले नातलग जवळ येथील मित्र दिलेले शब्द पाळतील नव्या योजना वेग घेतील. गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

कर्क – ( शुभ रंग- मोरपंखी)

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. दैव तुमच्या बाजूने आहे काळजी करू नका. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न मात्र दुर्लक्षित होतील.

सिंह- ( शुभ रंग- गुलाबी)

मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. शासकीय कामे मात्र रखडतील.

कन्या- (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात भिडस्तपणाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज कष्टांचाही अतिरेक करू नका तब्येतीकडे लक्ष असू द्या. अत्यंत कंटाळवाणा दिवस असून आज तुम्हाला एखाद्या सत्संगाची गरज भासेल.

तूळ-( शुभ रंग – चंदेरी )

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही जुनी दुखणे आज डोके वर काढण्याची शक्यता आहे रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. येणी असतील तर मागा.

धनु- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडीस प्राधान्य द्याल. गरजूना आपण होऊन मदत कराल.  तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर-( शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. मागण्या पूर्ण झाल्याने बच्चे कंपनी खुश असतील. गृहिणी आज अति व्यस्त.

कुंभ – ( शुभ रंग- मरून )

आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शेजार्‍यांशी असलेले मतभेद सुसंवादाने दूर होतील.

मीन – ( शुभ रंग- मोतिया )

तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. नवीन परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.